acb
acb 
देश

बेळगाव : खानापूरच्या एसीएफवर एसीबीचा छापा

सकाळवृत्तसेवा

बेळगाव : खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमान नगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुपारपर्यंत त्यांच्याकडे रोकड, स्थावर मालमतेची कागदपत्रे, सोन्याचांदीचे दागिने व दोन जेसीबी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेळगावसह गदग व धारवाडच्या पथकाने संयुक्तरित्या आज पहाटे सहा वाजता कारवाईस प्रारंभ केला. पाटील यांच्या मालकीची रामतीर्थनगर व हनुमान नगर येथे घरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यरगट्टी (ता. सौन्दत्ती) येथे त्यांच्या मालकीचा विटांचा कारखाना आहे. बैलहोंगल येथे त्यांच्या भावाच्या नावावर दोन जेसीबी आहेत. त्या त्यांच्यात मालकीच्या आहेत का याची शहानिशा ही पथकाकडून करण्यात येत आहे. शिवाय आतापर्यंतच्या तपासात सहा लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने मिळाले आहेत. आज सायंकाळपर्यंत मालमत्ता व किमती ऐवज आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्याचा तपशील सायंकाळी दिला जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी 'सकाळ'ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT