rajasthan bjp chief madanlal saini claims that akbar used to misbehave with bikaner queen
rajasthan bjp chief madanlal saini claims that akbar used to misbehave with bikaner queen 
देश

अकबर महिलांच्या वेशात जाऊन छेड काढायचा: भाजप नेता

वृत्तसंस्था

जयपूर : भारतीय जनता पक्षाचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल शासक सम्राट अकबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले असून, सैनी हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

सैनी म्हणाले की, 'अकबर महिलांच्या वेशात मीना बाजारात जाऊन तेथील महिलांची छेड काढायचा. बिकानेरची राणी किरण देवी यांच्यासोबत अकबरने गैरवर्तन केले होते. गैरवर्तनानंतर राणी किरण देवी यांनी अकबरच्या गळ्याला तलवार लावली होती. अकबरने त्यावेळी जीवदान मिळण्यासाठी विनवणी केली होती. कोणत्याही व्यक्तीची महानता ही त्याच्या चरित्रावरुन समजते.'

सैनी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने राग व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा याबाबत म्हणाल्या, 'त्यांनी (सैनी) ज्या प्रकारची भावना व्यक्त केली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे.' दरम्यान, गुरुवारी (ता. 6) मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती देशभरात साजरी करण्यात आली. जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयातही महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर सैनी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. सैनी यांनी संवाद साधल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT