sachin pilot ashok gehlot
sachin pilot ashok gehlot 
देश

काँग्रेसची डोकेदुखी वाढणार; पायलट गटाचा फोन टॅपिंगचा आरोप

कार्तिक पुजारी

काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

जयपूर- काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा आरोप होत आहे. जयपूर जिल्ह्यातील चाक्सूचे काँग्रेस आमदार वेद प्रकाश सोलंकी यांनी शुक्रवारी दावा केलाय की, काही आमदारांचे फोन टॅपिंग केलं जात आहे. विशेष म्हणजे वेद प्रकाश सोलंकी सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (rajasthan politics congress leader sachin pilot ashok gehlot phone tapping)

काही आमदारांनी मला त्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचं सांगितलं, असा दावा सोलंकी यांनी केलाय. पण, आमदारांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत. सोलंकी यांनी असंही स्पष्ट केलं की, 'फोनचे टॅपिंग कोण करतंय आणि कोणाच्या आदेशानुसार करतंय हे माहिती नाही. माझे फोन टॅपिंग होतंय का नाही हे मला माहिती नाही. तसेच याप्रकरणी राज्य सरकारचा कितपत हात आहे, हेही मला माहिती नाही. पण, काही आमदारांनी मला सांगितलं की, त्यांचे फोन टॅपिंग होत आहे.'

सोलंकींनी सांगितलं की, 'आमदारांनी फोन टॅपिंग ओळखण्यासाठी एका ऍपची मदत घेतली होती. काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही माहिती दिली. पण, याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आमदारांनी सांगितलं की, पोलिस आणि गुप्तहेर अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.' सोलंकी यांना विचारण्यात आलं की, हे आमदार सचिन पायलट गटातील आहेत काय? यावर सोलंकी म्हणाले की, 'ते काँग्रेस आमदार आहेत.'

सोलंकी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महेश जोशी म्हणाले की, 'आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहेत. एका जबाबदार नेत्याने कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे चुकीचे आहे.' भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. अनेक काँग्रेस आमदार फोन टॅपिंगचा दावा करत आहेत. हे कोण आमदार आहेत पक्षाने स्पष्ट करावं. काँग्रेस स्वत:च्या आमदारांचे फोन टॅपिंग का करत आहे, असा सवाल भाजप राज्य अध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट करुन म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT