Rasgulla
Rasgulla 
देश

रसगुल्ला बंगालचाच..!

पीटीआय

नवी दिल्ली -  "रसगुल्ला कोणाचा' या मुद्यावरुन पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादात पश्‍चिम बंगालने बाजी मारली आहे. रसगुल्लासाठी पश्‍चिम बंगालला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामुळे रसगुल्ला हा बंगालमध्येच शोधला गेलेला पदार्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.

"जीआय'मुळे नोंदणीकृत आणि अधिकृत वापरकर्त्यालाच संबंधित उत्पादनाच्या नावाचा वापर करता येतो. ओडिशा सरकारने 2015 पासून "उल्टो रथ' महोत्सवात रसगुल्ला दिवस साजरा करण्यास सुरवात झाल्यापासून दोन राज्यांमधील वादाला सुरवात झाली होती. ओडिशा सरकारच्या म्हणण्यानुसार, रथ यात्रेच्या काळात भगवान जगन्नाथ देवी लक्ष्मीला एकटे सोडत असल्याने देवी नाराज होते. त्यामुळे तिला खूश करण्यासाठी भगवान तिला रसगुल्ले देतात. ही कथा ओडिशात घडत असल्याने रसगुल्ला मूळ ओडिशाचाच असल्याचे येथील सरकारचे म्हणणे होते. मात्र, पश्‍चिम बंगालने या कथेवर आक्षेप घेतला होता. रसगुल्ला हा नासक्‍या दुधापासून तयार करत असल्याने तो "अशुद्ध' असतो आणि देवाला कधीही त्याचा नैवेद्य दाखवित नाहीत. त्यामुळे भगवान जगन्नाथाने तो देवी लक्ष्मीला देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा दावा पश्‍चिम बंगालने केला होता.

आपल्या सगळ्यांसाठी गोड बातमी आहे. बंगालला रसगुल्ल्यासाठी जीआय मिळाल्याचा मला अभिमान आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT