Raw Agent Ajit Doval sakal
देश

Raw Agent Ajit Doval : ऑपरेशन ब्लु स्टारमध्ये रॉ एजेंट अजित डोवाल गुप्तचर नसते तर...

भारतीय सेनेच्या महत्त्वाच्या ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान त्यांनी गुप्तचर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ डिजिटल टीम

Raw Agent Ajit Doval : रॉ ही भारतातील सर्वात मोठी गुप्त संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांची आज पुण्यतिथी आहे तर या संघटनेचे एक खूप नामवंत एजेंट अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे.

रॉ एजेंट किंवा रॉ ऑफिसरच्या कामाविषयी बोलायचं तर हे काम इतक्या गुप्तपणे केलं जातं की त्यांच्या कार्याविषयी कोणालाच काहीही माहिती नसतं. एवढंच काय तर त्यांच्या घरच्यांना याविषयी काहीही कल्पना नसते. कदाचित तुमच्याही आजुबाजूला रॉचे लोक असू शकतात. आज आपण रॉ एजेंट अजित डोवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी जाणून घेऊया. ( Raw Agent Ajit Doval Operation Blue Star)

डोवाल हे 1968 बॅचचे IPS अधिकारी असून 1972 पासून त्यांनी इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळ हा IB मध्ये घालवला. त्यानंतर ते 2005 मध्ये IB च्या संचालक पदावरून रिटायर्ड झाले.

अजित डोवाल हे परकीय शत्रुंसाठी खूप मोठा धोका होते. त्यांच्या नावाची पाकिस्तानमध्ये दहशत होती. अंडर कव्हर एजंट म्हणून ते जवळपास सहा वर्षे म्हणजेच 1990 ते 1996 पर्यंत ते पाकिस्तानात होते. याशिवाय 1988 मध्ये डोवाल यांनी 'ऑपरेशन ब्लॅक ब्लंडर' मध्ये रिक्षाचालकाचा वेश धारण करुन गुप्तहेर म्हणून महत्त्वाची भुमिका बजावली होती

ऑपरेशन ब्लु स्टार मध्ये महत्त्वाची भुमिका

भारतीय सेनेच्या महत्त्वाच्या ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान त्यांनी गुप्तचर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी त्यांनी वेष बदलून भारतीय सेनेला महत्त्वाची माहिती पुरवली. याच महत्वपूर्ण माहितीच्या मदतीने हे ऑपरेशन यशस्वी झाले होते. या दरम्यान त्यांची भूमिका एका पाकिस्तानी गुप्तहेरची होती ज्याद्वारे त्यांनी खालिस्तानी लोकांचा विश्वास जिंकला होता. त्यांच्या छोट्या मोठ्या अपडेट ते भारतीय सेनेला देत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Miscarriage Causes: सतत गर्भपात का होतो? मग डॉक्टरांकडून जाणून घ्या याची कारणे, लक्षणे आणि उपाय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पाडव्याच्या रात्री निघाली रेड्यांची मिरवणूक

Tiger Group Viral Vieo : किंग नाही किंगेमेकर... टायगर ग्रुपचे मुंबई पोलिसांनाच आव्हान ? कारच्या टपावरील हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT