ravi-shankar-prasad
ravi-shankar-prasad 
देश

मंदीच्या विधानावर रविशंकर प्रसाद तोंडघशी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - देशात मंदी असल्याचे नाकारताना हिंदी चित्रपटांच्या कमाईच्या कोटीच्या कोटी उड्डाणांचा दाखला देणारे कायदामंत्री रविशंकर प्रसाद आपल्या त्याच विधानावर तोंडघशी आपटले आहेत. आपले वाक्‍य विपर्यस्त स्वरूपात वापरल्याचा कांगावा करणाऱ्या प्रसाद यांना आपले शब्द गिळून टाकताना  माफीनामा द्यावा लागला आहे.

प्रसाद यांची ही टिप्पणी आली. त्याच सुमारास जागतिक प्रतिस्पर्धात्मक सूचकांक अहवालातील भारताची कामगिरी व स्थान कमालीचे खालावल्याचे समोर आले. त्यानुसार या सूचकांकातील भारताची कामगिरी तब्बल १० जागांवर घसरली आहे. दुसरीकडे, ऐन सणासुदीच्या तोंडावर देशांतर्गत औद्योगिक उत्पादनात ऑगस्ट २०१९ या एका महिन्यात तब्बल १.१ टक्‍क्‍यांची घसरण झाली व गेल्या सात वर्षांतील हा नीचांक आहे. ही आकडेवारी केंद्र सरकारनेच दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रसाद यांचे विधान राजकीय संवेदनाहीनतेचे प्रतीक म्हणून मानले जाते.

प्रसाद यांनी मुंबईत म्हटले होते, की देशात तीन चित्रपट २ ऑक्‍टोबरला प्रदर्शित झाले व त्यांनी एका दिवसात १२० कोटींची कमाई केली. कोठे आहे मंदी? ज्या अर्थी लोक इतके पैसे खर्च करून सिनेमे बघायला जातात तेव्हा मंदी कशी व कोठे आहे? आम्ही कधीही म्हटले नव्हते, की बेरोजगारांना नोकरी देऊ. हा दिशाभूल करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. बेरोजगारीबाबत  एनएसओचे अहवाल नाकारताना प्रसाद यांनी सरकारच्या संस्थेच्या अहवालांना खोटे ठरविले. त्यांच्या या विधानांवर संतप्त प्रतिक्रिया उमटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT