narendra modi
narendra modi 
देश

मोदी 'त्या' आश्वासनाचे काय झालेः संघ

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे.

राम मंदिरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींचे वक्तव्य राम मंदिराच्या निर्माणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे वाटते. पण 2014 मध्ये देशातील जनतेने राम मंदिराच्या मुद्द्यावरुनच भाजपाला बहुमत दिले होते. सरकारने याच कार्यकाळात या आश्वासनाची पूर्तता करावी’, असे संघाने म्हटले आहे.

मोदींच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'मोदींचे विधान आम्हाला राम मंदिराच्या निर्माणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल वाटते. भाजपने 1989 मधील पालमपूर अधिवेशनात ही राम मंदिरासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 2014 मध्ये जाहीरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. देशातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला बहुमताने निवडून आणले. आता सरकारने याच कार्यकाळात राम मंदिराचे आश्वासन पूर्ण करावे, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे.'

दरम्यान, देशात सध्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असून संघ, विश्व हिंदू परिषद तसेच शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव निर्माण केला आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणीही केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) यावर स्पष्टीकरण दिले. राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल असे, मोदींनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT