sanjay raut press conference upa leadership sharad pawar
sanjay raut press conference upa leadership sharad pawar 
देश

यूपीएचं नेतृत्व शरद पवारांकडे? संजय राऊतांचं पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील पक्षाकडून करण्याची मागणी सहयोगी पक्षांकडून होत आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज, दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा मान राखावा आणि जबाबदारीने काम करावे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. राज्यपालांकडे 12 आमदारांची यादी देऊन बरेच महिने झाले. मात्र, अद्याप त्यांच्याकडून निर्णय झालेला नाही. त्यांना त्यावर पीएचडी करायची आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. याचवेळी यूपीएच्या नेतृत्वावरही राऊत यांनी भाष्य केलं. त्यात शरद पवार यांच्याकडे यूपीएचं नेतृत्व देण्यात येईल, असे संकेतही राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. अनिल देशमुख यांची चौकशी होईल, त्यांच्या राजीनाम्याची सध्या गरज नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांकडे नेतृत्व?
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे प्रभारी अध्यक्षपदही आहे. दिल्लीत सध्या यूपीएच्या नेतृत्वावरून चर्चा सुरू असताना, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केले. राऊत म्हणाले, 'यूपीएचं नेतृत्व काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाने करण्याची चर्चा सुरू आहे. आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडं देण्याला यूपीएतील घटक पक्षांकडून कोणताही विरोध नाही.' राऊत यांच्या या वक्तव्याने भविष्यात यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यपालांना टोला
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी परवानगी मागितली होती. राज्यपाल देहराडून दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. त्यावरून संजय राऊत यांनी, राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावला. बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली आहे. त्यांना त्यावर पीएचडी करायची आहे का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. तसेच आम्हाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ नाही का? असेही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

SCROLL FOR NEXT