Rafale_deal.jpg
Rafale_deal.jpg 
देश

राफेल विमाने येत असल्याने 144 कलम लागू; फोटो काढण्यास सक्त मनाई

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- राफेल लढाऊ विमाने लवकरच भारतात दाखल होणार आहेत. फ्रान्समधून उड्डान केलेली ही विमाने काही तासात अंबाला हवाई तळावर उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही फोटोग्राफ किंवा व्हिडिओ काढू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. बुधवारी 5 राफेल विमाने हरियाणाच्या अंबालामध्ये उतरणार आहेत. त्यामुळे  परिसरातील 4 गावांमध्ये कलम 144 लागू करण्यात आला असून चारपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मुलाने हिंदूची मागितली माफी
घराच्या गच्चीवर जमा होणे, राफेल विमान उतरताना फोटो काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हवाईतळापासून 3 किलोमीटर अंतरावर ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरात ड्रोन दिसल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक डिएसपी मुनिश सेहगल यांनी दिली आहे. पाच राफेल विमाने फ्रान्सच्या मेरीग्नॅक हवाईतळावरुन सोमवारी भारतातील अंबालाच्या दिशेने निघाले आहेत. राफेल विमानांना 7 हजारांपेक्षा जास्त किलोमिटरचं अंतर कापावं लागणार आहे. विमाने या प्रवासात फक्त एकाच ठिकाणी थांबणार आहेत. राफेल विमानांनी युनायटेड अरब अमिरातीत (यूएई) येथे उतरुन आज सकाळी इंधन भरलं.

कोणालाही हवाई तळापासून दूर ठेवण्याची विनंती पोलिसांना हवाई दलाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला असून कोणलाही या परिसरात विनाकारण भटकण्यास मनाई करण्यात आली आहे. हवाईदलाचे प्रमुख मार्शल आर.एस. भदोरीया राफेल विमानांच्या आगमनावेळी अंबाला येथे असणार आहेत.

 बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर राज्यात तगडा बंदोबस्त; अवैध प्राण्यांच्या वाहतूकीवर...
भारताने फ्रान्ससोबत 36 विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 विमाने भारतात दाखल होत आहेत. आतापर्यंत 12 लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले असून आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 10 राफेल लढाऊ विमाने देण्यात येणार होती. पण अन्य विमाने तयार नसल्यामुळे सध्या 5 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत.  2 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात 10 ऐवजी 5 विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. 

(edited by-kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT