Sanjay Raut
Sanjay Raut 
देश

Loksabha 2019 : शिवसेना गोव्यात स्वतंत्र लढणार; दोन्ही उमेदवार जाहीर

अवित बगळे

पणजी : शिवसेनेने आज लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर करत गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांचीही घोषणा केले. शिवसेनेचे गोवा संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून राज्य उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक या  निवडणूक लढवतील असे जाहीर केले.

शिवेसेनेने 2017 मधील विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच या पक्षाशी युती केली होती. आता त्या पक्षाने शिवसेनेला विश्वासात न घेता तिन्ही विधानसभा पोट निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

त्याबाबत आज राऊत यांनी सांगितले, की विधानसभा पोट निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून शिवसेना गोवा सुरक्षा मंचासोबत युतीने लढण्यास इच्छूक आहे. त्यासाठी आवश्यक ती चर्चा गोवा सुरक्षा मंचाचे पक्ष प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याशी केली जाईल. गोवा सुरक्षा मंचाने अद्याप लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

राऊत म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील विधानसभा पोट निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवार तयार आहे. त्या नावाची घोषणा वेलिंगकर यांच्या भेटीनंतरच केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT