देश

ईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपला 'जिओ'ने पुरविले सिग्नल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती,' असा दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे. 

शुजाने 'स्काइप'द्वारे लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पत्रकार परिषदेवेळी तो तोंडावर फडके बांधूनच बसला होता. इंडियन जर्नलिस्ट्‌स असोसिएशनने (युरोप) ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. "माझ्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते. काही सहकाऱ्यांचे खून झाल्यानंतर घाबरून जाऊन मी 2014 मध्ये परदेशात पळून गेलो,'' असे दावा शुजाने केला आहे. 

"फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही ईव्हीएम गैरव्यवहार कसा करतात हे ठाऊक आहे,'' असा दावा करून शुजा म्हणाला, "दिल्लीतील 2015 मधल्या निवडणुकीतही घोळ होणार होता, परंतु वेळीच दुर्घटना रोखली आणि आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकल्या अन्यथा भाजपने निवडणूक जिंकली असती.'' ईव्हीएमचा आराखडा तयार केलेल्या इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (ईसीआय) संघात आपण होतो, असा शुजाचा दावा आहे. मतदान यंत्रे हॅक कशी करता येतील हे दाखवू शकतो, असा दावाही शुजाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT