Kshitij Zarapkar
Kshitij Zarapkaresakal

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Kshitij Zarapkar: क्षितीज झारापकर यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे

Kshitij Zarapkar: अभिनेता, लेखक, दिग्दर्शक क्षितीज झारापकर (Kshitij Zarapkar) यांचे आज सकाळी 10 च्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. क्षितीज झारापकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. ते चर्चा तर होणारच या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते.

क्षितीज झारापकर यांना मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या घरात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारा शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील.

क्षितीज झारापकर हे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक होते. सुंदरा मनामध्ये भरली या नाटकाच्या टीम बरोबर शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेले क्षितीज भारतात आले त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात ते रमला आणि स्थिरावले देखील. 2019 मध्ये रिलीज झालेल्या हुतात्मा या वेब सीरिजमध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारली होती.

घडलंय बिघडलंय, राजा शिवछत्रपती,स्वराज्यरक्षक संभाजी,स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत त्यांनी काम केलं होतं.

Kshitij Zarapkar
Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

क्षितीज झारापकर यांनी 'या' चित्रपटात केलं काम

ठेंगा, गोळा बेरीज, आयडियाची कल्पना, एकुलती एक, बायकोच्या नकळत या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच त्यांचे चर्चा तर होणारच हे नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या नाटकात क्षितीज यांच्यासोबतच अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com