drone.jpg 
देश

चीन-पाकसाठी धोक्याची घंटा! भारताच्या ताफ्यात लवकरच येणार 'ते' घातक अस्त्र 

दीनानाथ परब

ड्रोन्समुळे युद्ध तंत्रात मोठा बदल झाला आहे. भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन्सची भूमिका खूप महत्त्वाची असेल. अर्मेनिया आणि अझरबैजानमधील युद्धात ड्रोन किती निर्णायक ठरु शकते ते दिसून आले. ड्रोन्समुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर हवाई हल्ला करता येऊ शकतो. मिसाइल्स म्हणजेच क्षेपणास्त्र आणि लेझर गाइडेड बॉम्बच्या मदतीने शत्रुच्या तळावर अचूक प्रहार करण्याची क्षमता ड्रोन्समुळे प्राप्त होते. भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यातही लवकरच अशा लढाऊ ड्रोन्सचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे बालाकोट सारखा एअर स्ट्राइकही अधिक सहजतेने आणि अचूकतेने करता येऊ शकतो. शत्रुला कुठलीही खबर लागू न देता हजारो फूट उंचीवरुन होणारा हवाई हल्ला हे ड्रोनचे वैशिष्टय आहे. 

भारत खरेदी करु  शकतो 30 सशस्त्र ड्रोन्स  
अमेरिकेच्या जनरल अ‍ॅटोमिक्स कंपनीसोबत लवकरच 30 सशस्त्र ड्रोन्स खरेदी करण्यासाठी तीन अब्ज डॉलर्सचा करार होऊ शकतो. हा करार प्रत्यक्षात आला तर लष्कर, नौदल आणि एअर फोर्सला प्रत्येकी दहा लढाऊ ड्रोन्स मिळतील. सध्या भारत फक्त टेहळणीसाठी ड्रोन्सचा वापर करतो. चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादात पी-8 आय  ड्रोन्सची सैन्याला भरपूर मदत होत आहे. गुप्तचर मोहिमांमध्ये टेहळणी, ओळख पटवणं आणि प्रत्यक्ष हवाई हल्ला ड्रोनमुळे शक्य होतो. ड्रोन्स मानवरहित असल्यामुळे वैमानिकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय मोहिम पार पाडता येते. 

अमेरिकेने हे तंत्रज्ञान जगाला कधी दाखवलं?
डोंगराळ प्रदेशातही अचूकतेने वार करता येते. अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या अलकायदा विरोधात सर्वप्रथम हे ड्रोन तंत्रज्ञान जगाला दाखवले. सध्या भारताकडे इस्रायली बनावटीची हेरॉन ड्रोन्स आहेत. ज्याचा टेहळणीसाठी वापर केला जातो. चीन आणि पाकिस्तान हे भारताचे पारंपारिक प्रतिस्पर्धी  आहेत. सध्याच्या घडीला चीनकडे लढाऊ ड्रोनचे तंत्रज्ञान आहे. चीनने ही फायटर ड्रोन्स काही देशांनाही निर्यात केली आहेत. लडाख सीमावादाचा अनुभव लक्षात घेता, लवकरात लवकर या लढाऊ ड्रोन्सचा ताफ्यात समावेश होणे आवश्यक आहे. 

समजून घ्या किती घातक आहे MQ-9  प्रीडेटर ड्रोन 
MQ-9 ला प्रीडेटर ड्रोनही म्हटले जाते. MQ-9 त्याच्यामध्ये बसवण्यात आलेले सेन्सर्स आणि रडार्सच्या मदतीने लक्ष्याला शोधून काढते. सलग 27 तास उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. 50 हजार फूट उंचीवरुन उड्डाण करण्याची क्षमता असलेले हे ड्रोन 1700 किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते.  प्रीडेटर ड्रोनमधून घातक हेल फायर मिसाइल डागता येते तसेच लेझर गाइडेड बॉम्बने हल्ला करण्यासही समर्थ आहे. अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये या ड्रोन्सचा वापर केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT