special lunch organized for guests of G-20 summit industrialists invited sakal
देश

G-20 Summit : जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन; अंबानी, अदानींसह ५०० जणांना निमंत्रण

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत आज द्विपक्षीय चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नामांकित व्यक्तींना, उद्योगपतींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

यात रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांच्यासह ५०० जणांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

येत्या ९ व १० सप्टेंबरला होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून व्यवस्था पूर्ण झाली असून आता दिल्लीत सुरक्षा जवानांचा वेढा दिल्लीतील बहुतेक ठिकाणी लागला आहे. ९ सप्टेंबर रोजी परिषदेची सुरुवात झाल्यानंतर रात्री राष्ट्रपतींतर्फे पाहुण्यांना स्नेहभोजन दिले जाणार आहे.

या स्नेहभोजनासाठी देशातील ५०० मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यात रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी, अदानी समुहाचे गौतम अदानी यांच्यासह टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, एअरटेलचे सुनील मित्तल,

बिरला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला यांची प्रामुख्याने उपस्थित असेल. पाहुण्यांना सर्व प्रकारचे व्यंजन मिळणार आहे. तसेच राजस्थानमधून चांदी व गोल्ड प्लेटेड ताट, वाट्या आण ग्लास तयार करून घेतले आहे. यासाठी देश-परदेशातून विशेष शेफ बोलविण्यात आले आहेत.

मेट्रोचा वापर करावा

येत्या ८ ते १० सप्टेंबर या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. प्रामुख्याने विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनी मेट्रोनेच प्रवास वापर करावा, असे आवाहन केले आहे. कारण मोटारीने जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्र्यांवर स्वागताची जबाबदारी

जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यमंत्र्यांवर टाकली आहे. प्रत्येक मंत्र्याला कोणत्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करावयाचे व परिषद संपल्यानंतर त्यांना विमानतळावर निरोप कुणी द्यायचा, याची नावे निश्चित करण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांना या काळात दिल्लीतच राहण्याचे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

बायडेन यांचा पहिला दौरा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा हा पहिला भारत दौरा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या अमेरिकेचे सुरक्षा रक्षक दिल्लीत पोचले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह करणार आहेत.

राजधानी दिल्ली सजली

राजधानी दिल्ली शहर नववधूसारखी सजली आहे. विमानतळ ते प्रगती मैदानपर्यंत जी-२० परिषदेनिमित्त स्वागताचे फलक लावण्यात आले आहे. या परिषदेचे घोषवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ असे फलकांवर लिहले आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूवरही रोषणाई करण्यात आली आहे. लाल किल्ला, इंडिया गेट, राजघाट, कुतुबमिनार, हुमायूनचा मकबरा, अक्षरधाम मंदिर, पुराना किल्ला या सर्व वास्तूंवर रोषणाई करण्यात आली आहे.

सुरक्षेला प्राधान्य

दोन दिवस दिल्लीत जवळपास ४० देशांचे राष्ट्रप्रमुख राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्लीत आलेल्या १ लाख ३० हजार जवानांवर आहे. आतापासून श्वान पथकेही हॉटेल व विमानतळांवर तैनात करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच भारतीय हवाईदलाच्या मदतीने काही विमाने सुद्धा तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT