देश

पुलवामा हल्ल्याबाबत लोकसभाध्यक्षांची संतप्त भावना 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः स्वातंत्र्यानंतर भारताची घोडचूक ठरलेल्या एका काश्‍मीर समस्येमध्ये देशाने एका युद्धात जेवढे मारले जातील त्यापेक्षा जास्त जवान गमावले आहेत. पुलवामातील ताजा भ्याड हल्ला म्हणजे "आता तर अति झाले' अशा प्रकारचा आहे. या कठीण काळात छत्रपती शिवरायांच्या रणनीतीची व आदर्शांची ज्योत मनामनांत प्रज्वलित केली पाहिजे व हतप्रभ न होता शत्रूराष्ट्राला कणखरपणे लढत राहिले पाहिजे, अशी भावना लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली. 

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठा लाइट इन्फ्रन्ट्रीचे प्रमुख, मेजर जनरल जे. एस. पन्नू, खासदार नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी दिल्लीतील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवराय केवळ महाराष्ट्र किंवा मराठा समाजपुरते नसून ते राष्ट्रदैवत व देशाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे आगामी काळात दिल्लीतील शिवजयंती महोत्सव सर्व राज्यांतील लोकांच्या सहभागाने साजरा करण्यावर आपला भर राहील, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय कला केंद्र या दरम्यान आज सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीने अवघ्या नवी दिल्लीचे लक्ष वेधून घेतले. सुरवातीला महाराष्ट्र सदनातील शिवपुतळ्याला संभाजीराजे, निवासी आयुक्त समीर सहाय आदींच्या हस्ते हार घालण्यात आला. त्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम झाला. हत्ती, घोड्यांचा सहभाग व मावळ्यांच्या व वारकऱ्यांच्या वेशातील तरुणांनी मिरवणुकीला आगळी रंगत आणली. भगवे फेटे बांधलेल्या हजारो तरुणांचा शिस्तबद्ध जथा शिवरायांचा व ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत दिल्लीच्या राजपथ परिसरातून जाताना या ऐतिहासिक परिसरात चैतन्याचे झरे निर्माण झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT