surgical strike soldier martyr in kashmir he has killed 3 militents
surgical strike soldier martyr in kashmir he has killed 3 militents 
देश

सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईतील 'वीरजवान' हुतात्मा

वृत्तसंस्था

श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील वीरजवान लान्सनायक संदीप सिंह एका चकमकीदरम्यान हुतात्मा झाले आहेत. तसेच सिंह यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.     

लष्करातील लान्सनायक या पदावर कार्यरत असलेले संदीप सिंह हे पंजाबमधील गुरुदासपूरचे रहिवासी होते. भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या कारवाईत संदीप सिंह यांना वीरमरण आले. 4 पॅरा कमांडो पथकांच्या साथीने तंगधार सेक्टरमधील गगाधारी भागात दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु केली होती. लष्कराच्या 'ऑपरेशन ऑलआऊट' कारवाईदरम्यान त्यांना काही संदिग्ध हालचाली दिसून आल्या. या कारवाईत दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सिंह यांच्या पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांकडून सुरु असलेल्या गोळीबारात सिंह यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुच ठेवला होता. यामध्ये संदीप सिंह यांना वीरमरण आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT