Sushant-Singh-case
Sushant-Singh-case 
देश

सुशांतसिंह मृत्यु प्रकरण; सीबीआयतर्फे रियाविरोधात गुन्हा दाखल

पीटीआय

नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  आज बिहार पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेत अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात एफआयआर दाखल केला.  सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर ‘सीबीआय’मार्फत आता लवकरच चौकशी सुरु होऊ शकते. 

सीबीआयने रिया आणि इतर पाच जणांवर गुन्हेगारी कट रचणे, चोरी करणे आणि आत्महत्येला प्रवृत्त करणे असे आरोप ठेवले आहेत. चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिली, असा सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी बिहार सरकारकडे केल्यानंतर बिहारने केंद्राकडे याबाबत शिफारस केली होती. ही शिफारस काल केंद्र सरकारने मंजूर केली. सीबीआय तपासाला मंजुरी दिल्याचे केंद्राने काल सर्वोच्च न्यायालयातही सांगितले. केंद्र सरकारने शिफारस मान्य केल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनीही, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही तपास केला नाही आणि केवळ प्रसिद्धीसाठी ते लोकांची चौकशी करत होते. त्यांनी एफआयआरही दाखल केला नाही, अशी टीका केली. 

‘सीबीआय’मधील पोलिस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे तपास होणार आहे. या तपासावर पोलिस महानिरीक्षक गगनदीप गंभीर आणि सहसंचालक मनोज शशीधर हे दोघे गुजरात केडरचे अधिकारी देखरेख ठेवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रिया चक्रवर्तीला ‘ईडी’ची नोटीस
मुंबई - सुशांत मृत्यूप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावत आज (ता. ७) येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ‘ईडी’ने काल रियाचा सहकारी सॅम्युएल मिरांडा यांची चौकशी केली होती. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर बिहारमध्ये एफआयआर दाखल झाल्यावर ‘ईडी’ने ३१ जुलैला त्यांच्याकडेही गुन्ह्याची नोंद केली होती. गेल्या वर्षभरात सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये त्याच्याशी संबंधित नसलेल्या खात्यांमध्ये हस्तांतरीत झाल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT