Tata Motors
Tata Motors esakal
देश

Tata Motors : 'टाटा'कडून कर्मशिअल वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ; वर्षात दुसऱ्यांदा दरवाढ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी आहे. कंपनीने आता व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

१ एप्रिल २०२३ पासून टाटा कंपनी कर्मशिअल वाहनांच्‍या किंमतीत जवळपास ५ टक्‍क्‍यांची वाढ करणार आहे. किंमती वाढवण्याचा निर्णय हा बीएस-६ फेज २ उत्सर्जन नियमांचे अधिक कठोर पालन करण्यासाठी घेण्यात आल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

प्रदूषण नियमांची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा मिळणार आहेत. तांत्रिकदृष्ट्यासुद्धा ही वाहनं उच्च प्रतिची असतील. यासह लो कॉस्ट ओनरशीपचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

वाहनांच्या किंमतीमधील ही वाढ कर्मशिअल वाहनांसाठी आहे. वैयक्तिक स्वरुपाच्या वाहनांच्या प्रकारानुसार त्यात बदल होतील,असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.

कंपनीने जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या किमती 1.2% ने वाढवल्या होत्या. महागाईमुळे उत्पादन खर्च वाढल्याने तो निर्णय घेण्यात आला. तर जग्वार लँड रोव्हर कंपनीने फेब्रुवारीमध्ये Tiago EV प्रकारांच्या गाड्यांच्या किंमती 20,000 रुपयांनी वाढवल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT