telangana cm kcrs anr party trs reply to pm narendra modis charge
telangana cm kcrs anr party trs reply to pm narendra modis charge  
देश

तर मग हे जय शाह कोण आहेत?; PM मोदींच्या टीकेला TRS चे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरूवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात एका सभेत राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) वर घराणेशाहीचे आरोप केले होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांना त्यांच्या पक्षाकडून चोख उत्तर देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, तेलंगणासाठीचा संघर्ष हा केवळ एका कुटुंबाच्या सत्तेसाठी नव्हता, राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना, गुणवंताना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. परिवारवादामुळे अशा तरुणांच्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा होतो आणि त्यांना राजकारणात येण्याची दारे बंद केली जातात. दरम्यान पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर सीएम केसीआर यांच्या पक्षाने प्रत्युत्तर दिलं आहे. या विधानावर पक्षाने म्हटले की, पंतप्रधान मोदी देशाच्या पंतप्रधानांप्रमाणे बोलले नाहीत तर ते भाजपच्या नेत्याप्रमाणे बोलले.

घराणेशाहीच्या राजकारणाच्या आरोपांवर, केसीआरचा पक्ष टीआरएसचे प्रवक्ते कृशांक माने म्हणाले की, पंतप्रधानांनी फक्त परिवारवादावर बोलले. तसे असेल तर भारताच्या क्रिकेटचे नेतृत्व करणारे हे जय शहा (केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र) कोण आहेत? जर त्यांचा घराणेशाहीला विरोध असेल, तर त्यांनी राजनाथ सिंह आणि त्यांच्या मुलाची हकालपट्टी करावी. जय शाह हे क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत.

सीएम केसीआर यांनीही पीएम मोदींच्या आरोपांवर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या आरोपांना भाषणबाजी म्हणून फेटाळून लावले. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधत ते म्हणाले, परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, मात्र दररोज भाषणे केली जात आहेत. जीडीपी घसरत आहे आणि महागाई वाढत आहे... देश बदलला पाहिजे आणि देश बदलेल.

विशेष म्हणजे, आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले होते की, तेलंगाणातील लोक हे पाहत आहेत की जेव्हा एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर येतात तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे चेहरे बनतात. तेलंगणातील लोक हे पाहत आहेत की कौटुंबिक पक्ष केवळ स्वतःची भरभराट करतात आणि आपली तिजोरी भरतात. पंतप्रधानांनी राजकीय घराणेशाही सत्तेतून काढून टाकली जाते तेव्हा विकासाचे मार्ग खुले होतात असे देखील सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT