Chandrababu Naidu
Chandrababu Naidu 
देश

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडू 53 दिवसानंतर तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांचे मानले आभार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तेलगु देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ५३ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून एका घोटाळ्याप्रकरणी राजाहूमुद्री मध्यवर्ती तुरंगात कैदेत होते. सुटकेनंतर त्यांनी पाठिंब्याबाबत आपला समर्थकांचे आभार मानले आहेत. (Telugu Desam Party TDP chief former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu walked out of the Rajahmundry Central Jail after 53 day)

कौशल्य विकास विभागात कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवारी झाली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश हायकोर्टाने त्यांना आज अंतरिम जामीन मंजून केला आहे. चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्यांचा जामीन मिळाला आहे. सुटकेनंतर चंद्राबाबू म्हणाले की, आंध्राच नाही तर तेलंगणा आणि देशातील इतर भागातील लोकांनी मला पाठिंबा दर्शवला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

चंद्राबाबू यांनी जनसेना पक्षाचे पवन कल्यान यांचे विशेष आभार मानले. पवन कल्यान यांनी चंद्राबाबू यांना उघड पाठिंबा देत त्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. नायडू यांनी भाजप, सीपीआय, बीआरएस आणि काँग्रेस या पक्षांचा देखील उल्लेख केला. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ श्रीकाकूलम ते खुप्पम अशी सायकल यात्रा काढली होती. त्यांचेही नायडू यांनी आभार मानले.

चंद्राबाबू नायडू यांच्या वकीलाने कोर्टात बाजू मांडताना म्हटलं की, माजी मुख्यमंत्र्यांची सर्जरी करायची आहे. त्यांच्या उजव्या डोळ्यात दोष आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मंजूर करण्यात यावा. कोर्टाने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करताना म्हटलं की, नायडू यांनी २८ नोव्हेंबर किंवा त्याआधी तुरुंगाच्या अधिक्षकांसमोर हजर व्हावे.

नायडू यांना एक लाख रुपयांचा बाँड सादर केल्यानंतर जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उपचारानंतर हॉस्पिटलमधील वैद्यकीय कागदपत्रे तुरुंग अधिक्षकांकडे सादर करावे लागतील. नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT