Ajit Doval Esakal
देश

Ajit Doval : कट्टरपणाविरोधात उलेमांची भूमिका मोलाची

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘सीमेपलिकडून होणारा आणि इसिस पुरस्कृत दहशतवादाचा अद्यापही भारताला मोठा धोका आहे. देशात कट्टरतावाद आणि मूलतत्ववाद यांचा प्रसार रोखण्यात उलेमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी. त्यासाठी त्यांनी युवकांमध्ये प्रगतिशील कल्पना आणि विचारांचा प्रसार करावा,’ असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज केले.

इंडोनेशिया आणि भारतातील उलेमांच्या शिष्टमंडळादरम्यान आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्‌घाटन अजित दोवाल यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी दोवाल म्हणाले,‘‘इसिसने चिथावणी दिलेल्या एकेकट्या दहशतवाद्यांचा आणि सीरिया-अफगाणिस्तानमधून परतलेल्या गटांचा सामना करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य असणे आवश्‍यक आहे. इंडोनेशिया आणि भारताला दहशतवादाचा आणि फुटीरतावादाचा फटका बसलेला आहे. दहशतवादी कारवायांवर भारताने चांगलाच वचक बसविला असला तरी सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीचे आव्हान कायम आहे.

मुस्लिम समाजात उलेमांचे स्थान महत्त्वाचे आहे. सहिष्णुता, सौहार्द आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा प्रसार समाजात व्हावा, यासाठीच दोन्ही देशांमधील उलेमांमध्ये ही चर्चा घडवून आणली जात आहे. कट्टरतावाद आणि मूलतत्त्ववाद यांचा प्रसार रोखण्यात उलेमा महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.’’

अजित दोवाल म्हणाले

  • लोकशाहीत वंशद्वेषाला, हिंसाचाराला, धर्माच्या गैरवापराला स्थान नाही

  • युवकांना योग्य दिशा दिल्यास ते कोणत्याही समाजाच्या विकासाचा पाया बनू शकतात

  • अफवा आणि द्वेषमूलक प्रचाराला पायबंद आवश्‍यक

  • उलेमांनी तंत्रज्ञानाचा वापर करून कटकारस्थाने रोखावीत

  • धर्मातील खऱ्या संदेशावर उलेमांनी लक्ष द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकीकडे शटडाऊन अन् दुसरीकडे २१०० कोटी खर्चून डान्स हॉलचं बांधकाम; ट्रम्पनी व्हाइट हाऊसवर चालवला बुलडोजर

AUS vs IND: Virat Kohli ने ऍडलेडमध्ये खेळला शेवटचा वनडे सामना? शून्यावर बाद झाल्यानंतर केलेल्या कृतीने चर्चेला उधाण; VIDEO

Agniveer Recruitment : आनंदाची बातमी ! आता २५ ऐवजी ७५ टक्के अग्निवीरांना मिळणार सैन्यात कायमची नोकरी, प्रस्ताव लवकरच मंजूर होणार

16 Guruvar Vrat: फक्त १६ गुरुवार व्रत ठेवा आणि बदलून टाका आयुष्य; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jogeshwari Fire Accident : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला लागली भीषण आग; अनेक लोक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT