Mamata 
देश

सत्ताधाऱ्यांचं एकच काम सरकार खरेदी अन् विक्रीचं; ममतांचं मोदींसह भाजपला थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू - बंगळुरूमध्ये आज विरोधीपक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलाएन्स असं नाव देण्यात आले. एकूण २६ पक्ष या बैठकीत सामील होते. यावेळी ममता यांनी मोदींसह थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आजची बैठक अत्यंत चांगली झाली. देशात दलित, अल्पसंख्यांक, हिंदू, शिख, इसाई कोणाही असो हे संकटात आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं एकच काम आहे. मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, महाराष्ट्र, दिल्ली येथे एकच काम केले आहे. सरकार खरेदी करणे आणि विक्री करणे हेच सत्ताधाऱ्यांचं काम आहे.

ममता म्हणाल्या की, आमच्या इंडियाला एडीए किंवा भाजप आव्हान देऊ शकतं का? आम्ही सगळे भारतमातेवर प्रेम करतो. आम्ही देशासाठी, अर्थव्यवस्थेसाठी, दलितांसाठी लढा देणार आहोत. यापुढे संपूर्ण प्रचार, 'इंडिया' अंतर्गत होणार आहे. मणिपूरला वाचवायचं. देशाला वाचवायच आहे. भाजप देशाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजप कोणत्याही संस्थेला काम करू देत नाही. विरोधक काही बोलले की, त्याला ईडी-सीबीआयची नोटीस मिळते. त्यामुळे आता भारत जिंकणार आणि भाजप पराभूत होईल, असा दावाही ममता यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT