Time capsule for Ram Temple site brings back memories of Indira Gandhis Red Fort Kaalpatra
Time capsule for Ram Temple site brings back memories of Indira Gandhis Red Fort Kaalpatra 
देश

रामजन्मभूमीच नाही 'या' ठिकाणीही ठेवण्यात आली आहेत टाईम कॅप्सूल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या २ हजार फूट खाली एक टाइम कॅप्सूलदेखील ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु, यापूर्वीही देशात काही महत्त्वाच्या ठिकाणी जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोणत्या ठिकाणी ठेवले टाईम कॅप्सूल
यापू्र्वी, लाल किल्ल्यातही जमिनीच्या ३२ फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. १९७३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ही टाईम कॅप्सूल ठेवण्यात आलेली होती. इंदिरा गांधी यांनी १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ल्यात जमिनीच्या ३२ फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या घटना पुराव्यांसह यामध्ये ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी इंडियन काऊंन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चला मागील काळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याचं काम सोपवलं होतं. परंतु त्यावेळी सरकारच्या या निर्णयावरून मोठा वादही झाला होता.

इंदिरा गांधी यांनी स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा गुणगौरव केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, मोरारजी देसाई यांनी ही टाईम कॅप्सूल काढून त्यात कोणत्या गोष्टींची नोंद आहे हे पाहणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच मोरारजी देसाई यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी ती टाईम कॅप्सूल काढलीही होती. परंतु त्यात कसली नोंद करण्यात आली होती याचं रहस्य आजही कायम आहे.

लाल किल्ल्याव्यतिरिक्त आयआयटी कानपूरच्या ५० वर्षांच्या इतिहासाची माहितीदेखील टाईम कॅप्सूलद्वारे जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. या टाईम कॅप्सूलमध्ये आयआयटी कानपूरचं संशोधन आणि शिक्षकांशी निगडीत माहिती ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती अशाचप्रकारे टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे.

टाईम कॅप्सूल म्हणजे काय?
वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी या हेतूने ठेवलेली जंत्री म्हणजे टाईम कॅप्सूल होय.

भारताबाहेरही टाईम कॅप्सूलची संकल्पना
टाईम कॅप्सूलला मोठा इतिहास आहे. ही संकल्पना केवळ भारतातच नाही. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी स्पेनमध्ये ४०० वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये एक मूर्तीच्या आत काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १७७७ च्या आसपासचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबतची माहिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT