IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

IPL 2024, KKR vs SRH: आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वॉलिफायर वनचा सामना कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात रंगणार आहे.
KKR vs SRH | IPL 2024
KKR vs SRH | IPL 2024Sakal

IPL 2024, KKR vs SRH: मंगळवारी (21 मे) इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेतील ‘क्वॉलिफायर वन’ची लढत रंगणार आहे. हा सामना यंदाच्या मोसमातील अव्वल संघ कोलकता नाईट रायडर्स (20 गुण) व दुसऱ्या क्रमांकाचा संघ सनरायझर्स हैदराबाद (17 गुण) यांच्यात होईल.

या लढतीत विजेता होणारा संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची अंतिम फेरी गाठणार आहे. पराभूत झालेल्या संघालाही अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटर लढतीतील विजेत्याशी त्या संघाला दोन हात करावे लागणार आहेत.

कोलकता संघाने अखेरची पूर्ण लढत 11 मे रोजी मुंबईविरुद्ध खेळली आहे. त्यानंतर गुजरात व राजस्थान यांच्याविरुद्धच्या लढती पावसामुळे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे जवळपास दहा दिवस कोलकता संघातील खेळाडूंना विश्रांती मिळाली आहे. याचा फायदा त्यांना घेता येणार आहे.

KKR vs SRH | IPL 2024
MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

हैदराबादविरुद्धच्या लढतीत नव्या दमाने त्यांचा संघ मैदानात उतरू शकतो. दोन संघांमध्ये या मोसमात एकच लढत रंगली. दोन संघांमधील रोमहर्षक लढतीत कोलकता संघाने चार धावांनी विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासही हैदराबादचा संघ सज्ज असेल.

कोलकता संघाला प्ले-ऑफच्या लढतींत फिल सॉल्टची अनुपस्थिती जाणवण्याची शक्यता आहे. सॉल्ट टी-20 विश्‍वकरंडकाच्या तयारीसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. तरीही सुनील नारायण, श्रेयस अय्यर, नितीश राणा, अंगक्रीश रघुवंशी, आंद्रे रसेल यांच्यामुळे कोलकता संघ फलंदाजी विभागात सक्षम आहे.

एवढेच नव्हे तर कोलकता संघाचा गोलंदाजी विभागही तेवढाच ताकदवान आहे. मिचेल स्टार्कला गेल्या काही लढतींमध्ये सूर गवसला आहे. सुनील नारायण व आंद्रे रसेल हे वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू फलंदाजीसोबत गोलंदाजीतही ठसा उमटवत आहेत. वरुण चक्रवर्ती व हर्षित राणा यांच्याकडूनही गोलंदाजीत छान कामगिरी झाली आहे.

KKR vs SRH | IPL 2024
IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

हेड, शर्मा, क्लासेनवर भिस्त

हैदराबाद संघाच्या फलंदाजीची भिस्त ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा व हेनरिक क्लासेन या तीन खेळाडूंवर असणार आहे. राहुल त्रिपाठीला अंतिम अकरामध्ये संधी मिळते का हे पाहणे रंजक ठरेल.

कर्णधार पॅट कमिन्स, भुवनेश्‍वरकुमार व टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांवर त्यांची मदार असणार आहे. मयांक मार्कंडे, शाहबाज अहमद व वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांकडून म्हणावी तशी चमकदार कामगिरी झालेली नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजी त्यांच्यासाठी कमकुवत बाब ठरू शकते.

धावांचा पाठलाग करताना यश

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेल्या वर्षभरात धावांचा पाठलाग करणारे संघ विजयी ठरले आहेत. मागील सहापैकी चार लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारे संघ विजयी झालेले आहेत. फक्त दोन लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले.

त्यामुळे कोलकता-हैदराबादमधील लढतीत नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

KKR vs SRH | IPL 2024
Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

कोलकत्याचे वर्चस्व

दोन वेळा अजिंक्यपद पटकावलेला कोलकता आणि २०१६ मधील विजेता संघ हैदराबाद यांच्यामधील आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकालांवर लक्ष टाकल्यास कोलकता संघाचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येते.

दोन संघांमध्ये २६ लढती पार पडल्या आहेत. यापैकी कोलकता संघाने १७ लढतींमध्ये यश संपादन केले आहे. हैदराबाद संघाला नऊच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. अर्थात इतिहास जरी कोलकत्याच्या बाजूने असला तरी हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमात दमदार खेळ केला आहे. त्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाही.

हैदराबादचे यंदाचे अव्वल फलंदाज

  1. ट्रॅव्हिस हेड - 533 धावा

  2. अभिषेक शर्मा - 467 धावा

  3. हेनरिक क्लासेन - 381 धावा

हैदराबादचे यंदाचे अव्वल गोलंदाज

  1. टी. नटराजन - 17 विकेट

  2. पॅट कमिन्स - 15 विकेट

  3. भुवनेश्‍वरकुमार - 11 विकेट

कोलकताचे यंदाचे अव्वल फलंदाज

  1. सुनील नारायण - 461 धावा

  2. फिल सॉल्ट - 435 धावा

  3. श्रेयस अय्यर - 287 धावा

कोलकताचे यंदाचे अव्वल गोलंदाज

  1. वरुण चक्रवर्ती - 18 विकेट

  2. हर्षित राणा - 16 विकेट

  3. सुनील नारायण व आंद्रे रसेल - 15 विकेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com