smruti irani- rahul gandhi
smruti irani- rahul gandhi 
देश

राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला.

सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगाडगे यांचा नुकताच जबाब नोंदवण्यात आला. भाजप अध्यक्ष अमित शाह हे कथित एन्काऊंटरचे सूत्रधार आहेत, असे संदीप तामगाडगे यांनी सांगितले होते. यावर अमित शाह सत्यापासून लांब पळू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले होते. राहुल गांधी यांनी अमित शाहांवर निशाणा साधला ट्विटमध्ये म्हटले आहे की, "गीतेमध्ये सांगितले आहे की, तुम्ही सत्यापासून लांब पळू शकत नाही. अमित शाह हेच सोहराबुद्दीन एन्काऊंटरचे सूत्रधार असल्याचे संदीप तामगाडगे यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे. हा माणूस अध्यक्ष होणे, भाजपसाठी योग्य नाही."

राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर स्मृती इराणी यांनी प्रतिउत्तर देताना म्हटले आहे की, अमित शाह यांना 2014 मध्ये क्लिनचीट मिळाली आहे, हे असत्याची मशिन राहुल गांधी यांना माहित नाही का? राजकीय हेतूने अमित शाह यांना फसवण्यात आले, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. राहुल गांधी सांगतील का, की त्यांच्या शासनात हे कोणाच्या आदेशावरुन करण्यात आले होते? मी निश्चितपणे सांगू शकते, राहुल गांधी यांनी कधी गीता वाचली नसणार. कारण ते एवढे खोटं बोलले नसते.'

दरम्यान, सोशल मीडियावर दोघांचे ट्विट युद्ध सुरू झाल्यानंतर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT