Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

Mumbai North West Constituency: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर ( Ravindra Waikar) यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
 Ravindra Waikar
Ravindra Waikar

मुंबई- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर ( Ravindra Waikar) यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता रविंद्र वायकर विरुद्ध उबाठा गटाचे अमोल किर्तीकर यांच्यामध्ये थेट लढत होईल हे स्पष्ट झालं आहे.

उत्तर पश्चिम मुंबईमधून एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत उत्सुकता होती. अखेर शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. उत्तर पश्चिम मुंबईत आता वायकर विरुद्ध किर्तीकर यांच्यात लढत होईल. अमोल किर्तीकर हे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

 Ravindra Waikar
Lok Sabha Election : लोकसभा उमेदवारांच्या पेड न्यूज बातम्यांवर वॉच ठेवण्याचे केंद्रीय खर्च निरीक्षकांचे आदेश

रवींद्र वायकर यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लागला होता. ईडी, सीबीआय त्यांच्या मागे लागली होती. याच दरम्यान त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. दबावामुळेच त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असा आरोप उबाठा गटाकडून करण्यात आला होता. जोगेश्वरी पट्ट्यामध्ये शिवसेनेचे पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. रवींद्र वायकर हे जोगेश्वरीमधून आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत जोगेश्वरीमधील मतदार महत्त्वाची भूमिका बजावतील असं बोललं जातंय.

 Ravindra Waikar
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यास पक्षामधूनच विरोध होता. शिंदे गटात प्रवेश करणारे ते उबाठा गटाचे शेवटचे आमदार आहेत. महिन्याभरापूर्वीच ते शिंदे गटात आले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यांची ईडी चौकशी सुरु होती. उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून वायकर यांची ओळख होती. पण, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिंदे गटाकडून त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले.

सोमवारी रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये चर्चा झाली. रात्री अडीचच्या सुमारास वायकर शिंदेसोबत चर्चा करुन बंगल्यातून बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. अखेर उत्तर पश्चिम मुंबईचा उमेदवाराचा तिढा सुटला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com