देश

छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडमध्ये सीमा सुरक्षा दलाचे दोन (बीएसएफ) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (रविवार) चकमक झाली. या चकमकीत बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाले. ही चकमक छत्तीसगडच्या कंकर जिल्ह्यात झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बीएसएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमधील ही चकमक परतापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली. जेव्हा बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान नक्षलवादविरोधी मोहीमेवरून परतत असताना हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक (नक्षलवादविरोधी पथक) सुंदररराज पी. यांनी एका वृत्तसंस्थेनला दिली. 

या परिसरातील पेट्रोलिंग करणारे पोलिस बारकोट गावात आले होते. ही चकमक रायपूरपासून 250 किमीपासून जवळच्या परिसरात झाली. यावेळी नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळाबार सुरु केला. त्यानंतर या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये बीएसएफचे दोन कर्मचारी लोकेंद्र सिंग (रा. राजस्थान) आणि मुकधियार सिंग (रा. पंजाब) हे दोघे हुतात्मा झाले. तर संदीप डे हा जवान जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलैी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT