Kashmir
Kashmir 
देश

दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना लखनौमध्ये मारहाण 

पीटीआय

लखनौ (पीटीआय)  : शहरातील दलिगंज भागात सुकामेव्याची विक्री करणाऱ्या दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना जमावाने मारहाण केली. याचे चित्रण सीसी टीव्हीवर पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत चार जणांना अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 6) सायंकाळी घडली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध भागांत राहणाऱ्या काश्‍मिरी नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. तशीच घटना लखनौमध्ये काल घडली. दालिगंज पुलावर दोन काश्‍मिरी युवक सुकामेवा विकत होते. 

त्या वेळी जमावाने त्यांना मारहाण केली. ते दगडफेक करणारे होते, असे जमावाचे म्हणणे होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी दिली. एका सजग नागरिकाने या मारहाणीचे व्हिडिओ चित्रण केले होते. त्यामुळे ही घटना उजेडात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले व मुख्य आरोपी बजरंग सोनकर याच्यासह चार जणांना अटक केली. सोनकरवर खून, लुटालूट, चोरी व बेकायदा शस्त्र बाळगणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT