देश

दोघी सख्ख्या बहिणी झाल्या पीएसआय 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रायबाग तालुक्‍यातील यल्पारट्टीतील दोघी सख्ख्या बहिणींनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. दीपाली शिवानंद गोडोडगी आणि रुपाली शिवानंद गोडोडगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा कौटुंबिक जीवनापासून ते पीएसआय पदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा असाच आहे. 

शेतकरी शिवानंद गोडोडगी यांना तीन आपत्ये. त्यापैकी दोन्ही मुली दीपाली व रुपाली यांनी पोलीस खात्यात पदार्पण केले असून मुलगा शेती करतो. या दोघींनी ग्रामीण भागातील शाळेतच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जमखंडीतील बीएलडी संस्थेमध्ये पदवीपूर्व (पीयुसी) शिक्षण पूर्ण केले. पुढे चिक्‍कोडीतील बसवप्रभू कोरे पदवी महाविद्यालयामध्ये बीबीए पदवी मिळविली. त्यानंतर दोघी बहिणींनी स्पर्धात्मक परीक्षा देण्याची तयारी केली होती.

समाजकल्याण खाते आणि इतर मागास खाते यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर जैस या संस्थेत नऊ महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण संपल्यानंतर दोघींनीही धारवाडमध्ये भाड्याचे घर घेऊन त्याठिकाणी कठोर परिश्रम, जिद्द आणि सततच्या अभ्यास केल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणे शक्‍य झाले. आपल्या या यशाला आई-वडिलांचा आशीर्वाद कारणीभूत असल्याचे त्यांचे मत आहे. मुला-मुलींमध्ये कोणताही भेदभाव करु नये. शिक्षणाची आवड असलेल्या मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्याही चांगल्या पदापर्यंत पोहचू शकतात, हेच आपल्या दोन्ही मुलींनी सिध्द करुन दाखविले आहे, असे मत वडील शिवानंद यांनी व्यक्‍त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT