देश

MeToo : केंद्रीय मंत्री सदानंद गौडाही "MeToo'च्या जाळ्यात?

वृत्तसंस्था

बंगळूर: एम. जे. अकबर यांच्यानंतर आता दुसरे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा ही "MeToo' हिमेच्या जाळ्यात आडकले आहेत. गौडा यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या माधुरी मुधोळ यांनी केला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अकबर यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले असतानाच आता गौडा यांनाही हा आरोप भोवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

देशभरात सुरू असलेल्या "MeToo' ोहिमेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गौडा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या माधुरी मुधोळ यांनी केला आहे. कार्यालयात या, भोजनासाठी या, असे म्हणत गौडा वेळोवेळी फोन करून आपल्याला बोलवत होते. हाताने स्पर्श करणे, शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार गौडा करत होते, असा आरोप मुधोळ यांनी केला आहे. दरम्यान, मुधोळ यांची पोस्ट प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होताच त्यांनी ती डिलिट केली आहे. 

माधुरी मुधोळ या भाजपच्या महिला मोर्चात होत्या, याची मला आठवण आहे. परंतु, त्या वेळी मी मुख्यमंत्री नव्हतो, तर मी प्रदेशाध्यक्ष होतो. मी काय सांगितले हे सर्वांनाच माहीत आहे. मी कोणालाच काही सांगायला गेलो नाही. 
- सदानंद गौडा, केंद्रीय सांख्यकी राज्यमंत्री 

अभिनेता अर्जुनविरुद्ध श्रुतीचे आरोप 
बहुभाषिक कन्नड अभिनेता अर्जुन सर्जा याच्याविरुद्ध ही अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने आरोप केले आहेत. एका खासगी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने म्हटले आहे, की अभिनेता अर्जुन याने "विस्मय' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला आहे. रिसॉर्टला जाऊ, अभिनयाचा सराव करू, असा तो सारखा आग्रह करत होता. नको म्हटले तरी त्याने मला सोडले नाही, असा आरोपही तिने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT