HIV testing
HIV testing  esakal
देश

यूपीच्या तुरुंगात HIV च्या संसर्गाचा विस्फोट; २६ कैद्यांना एड्सची लागण झाल्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील एका तुरुंगातून धक्कादायक माहिती समोर येत आहे, राज्यातील कारागृहांमध्ये एचआयव्ही पसरण्याचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यातच बाराबंकी तुरुंगात गेल्या महिनाभरात 26 HIV पॉझिटिव्ह कैदी सापडले आहेत. या बातमी नंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या 10 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर या कालावधीत बाराबंकी कारागृहात 3 टप्प्यांत अरोग्य शिबिर आयोजीत करून HIV चाचणी करण्यात आली.

या तपासणीत 26 कैद्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यापैकी 4 कैद्यांवर एआरटी उपचार सुरू होते. आता नवीन 22 रुग्णांवर एआरटी करण्यात येणार आहे. बाराबंकी कारागृहात एवढ्या मोठ्या प्रमाणात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर, आता कारागृहात बंद असलेल्या महिला कैद्यांच्याही चाचण्या केल्या जाणार आहे. या कारागृहात सुमारे एक हजार कैदी आहेत. सांगितल जात आहे की या कैद्यांमध्ये नशा, शारीरिक संबंध यांमुळे एचआयव्ही पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

बाराबंकी जेलचे अधीक्षक दीपंकर कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, या रुग्णांना पुढील उचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी 23 जुलै रोजी सहारनपूर कारागृहातील कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. सहारनपूर कारागृहात जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

त्यात एक महिला कैदीही होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे तुरुंगांमध्ये होणारी ही गर्दी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत असुरक्षित लैंगिक संबंधाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT