देश

पीडित ननचे आता "व्हॅटिकन'ला साकडे 

सकाळन्यूजनेटवर्क

तिरुअनंतपूरम/कोची : रोमन कॅथलिक बिशप वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी व्हॅटिकनकडे केली आहे. या प्रकरणी व्हॅटिकनच्या भारतातील राजनैतिक प्रतिनिधीने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडित ननने पत्राद्वारे केली आहे.

बिशप फ्रॅन्को मुलक्कल हे राजकीय आणि आर्थिक बळाचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. संबंधित बिशपला पदावरून हटविण्याची मागणीही पीडित ननने व्हॅटिकनकडे केली आहे. 

पीडित ननने व्हॅटिकनचे भारतातील राजनैतिक अधिकारी जिआमबॅटिस्टा डिक्वॅट्रो यांना पत्र लिहून या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पंजाबमधील जालंधर येथील बिशप मुलक्कल आणि त्यांचे सहकारी हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप पुन्हा एकदा ननकडून करण्यात आला आहे. 

बिशप मुलक्कल यांच्या विरोधात कारवाई करण्यास उशीर होत असल्याचा दावा करीत नन्सच्या एका गटाने एर्नाकुलम न्यायालयाच्या परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर पीडित ननने आता थेट व्हॅटिकनकडे आपला न्याय देण्याची मागणी केली आहे. बिशप मुलक्कल यांनी आपल्यावर 2014 ते 2016 या कालावधीमध्ये अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित ननने केला आहे. 

वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन 

ननवरील बलात्कारप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणारे केरळमधील आमदाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय पीडित ननने घेतला आहे. केरळमधील आमदार पी. सी. जॉर्ज यांनी म्हटले होते, की 12 वेळा बलात्कार झाल्यानंतरही संबंधित ननने तक्रार केली नाही, मात्र तेराव्या वेळी तक्रार केली. जॉर्ज यांनी केलेले वक्तव्य अतिशय अपमानास्पद असून, त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे पीडित ननने म्हटले आहे. दरम्यान, जॉर्ज यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. एर्नाकुलम उच्च न्यायालयाजवळ पाच नन्सने सुरू केलेले धरणे आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट आहे, असे जॉर्ज म्हणाले. जॉर्ज हे पाला मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT