West Bengal
West Bengal 
देश

कोलकात्यातील भाजपच्या मोर्चाला हिंसक वळण

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज (बुधवारी) कोलकाताच्या लाल बाजारमधील पोलिस मुख्यालयाला घेराव घातला. दरम्यान, काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि काही ठिकाणी अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या.

मोर्चानिमित्त तीन हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. "आम्ही कोणतेही बॅरिकेड तोडलेले नसून शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढला होता. मात्र, बंगाल पोलिसांनी आपल्या बलाचा चुकीचा वापर केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाताच्या पोलिस आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे," असे भाजपच्या एका स्थानिक नेत्याने म्हटले आहे.

बंगालला गुजरात बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे : ममता

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवार (ता.11) म्हटले होते की, राज्यात झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे 8 कार्यकर्ते आणि भाजपचे 2 कार्यकर्ते मारले गेले, हे दुर्दैवी आहे. भाजप बंगालला गुजरात बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे, पण बंगालमध्ये गुजरातसारखी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. 

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी : विजयवर्गीय 
भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "बंगालमधील हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत. त्यांच्या पार्टीला ज्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे, त्या भागातील भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. बंगालमध्ये अशी हिंसा होत राहिल्यास केंद्राला हस्तक्षेप करावा लागेल. आवश्यक असल्यास बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.

परिस्थिती नियंत्रणाखाली
बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराप्रकरणी गृह मंत्रालयाने रविवार (ता. 9) सूचनापत्र जाहीर केले होते. बंगालचे मुख्य सचिव मलय कुमार यांनी सोमवार (ता. 10) सांगितले की, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असून लोकसभा निवडणुकीनंतर काही असामाजिक घटकांनी हिंसाचार केला. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी विलंब न करता धडक कारवाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT