Grandfather On Bike man Rides Up To Hospital Emergency Ward 
देश

Viral Video: हे तर 'थ्री इडियट्स'मध्ये पाहिलेलं! आजोबांना टू-व्हिलरवर घेऊन तो थेट आपत्कालीन वॉर्डमध्येच घुसला

आपल्या आजारी असलेल्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी नातूने आपली टूव्हिलर थेट आपत्कालीन वॉर्डमध्येच घुसवली आहे (Grandfather On Bike man Rides Up To Hospital Emergency Ward)

कार्तिक पुजारी

भोपाळ- प्रसिद्ध चित्रपट 'थ्री इडियट्स'मधला एक सीन खऱ्या आयुष्यामध्ये पाहायला मिळाला आहे. आपल्या आजारी असलेल्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी नातूने आपली टूव्हिलर थेट आपत्कालीन वॉर्डमध्येच घुसवली आहे. मध्य प्रदेशातील सटणा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ एकाने शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निरज गुप्ताचे आजोबा बेशुद्ध पडले होते. अशावेळी तो त्यांना तात्काळ आपल्या बाईकवरुन सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा रुग्णालयात घेऊन आला. यावेळी त्याने गाडी थेट आपत्कालीन वॉर्डरुममध्येच नेली. व्हिडिओमध्ये दिसतंय की, गुप्ताचे आजोब शुद्धीत नाहीत. एक व्यक्ती आजोबाला धरुन मागे बसला आहे. तर निरज गुप्ता गाडी चालवत आहे. (viral Video madhya pradesh news Grandfather On Bike man Rides Up To Hospital Emergency Ward)

निरज गुप्ता आजोबांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी कशाचीही परवा न करता टूव्हिलर थेट हॉस्पिटलमध्ये आणतो. वॉर्डरुममध्ये आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि हॉस्पिटलमधील एक कर्मचारी आजोबांना गाडीवरुन खाली उतरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर निरज गुप्ता टूव्हिलर घेऊन परत फिरतो. गाडी बाहेर लावून तो परत आपल्या आजोबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो.

निरज गुप्ताने गाडी हॉस्पिटलमध्ये आणल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. हॉस्पिटलमधील रुग्ण, कर्मचारी या घटनेकडे आश्चर्याने पाहत होते. मात्र, आजोबांची गंभीर स्थिती पाहून त्याने हे धाडस केल्याचं समजत आहे. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आजोबांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, सदर प्रकार पाहून थ्री इडियट्स चित्रपटाची आठवण आली नाही तर नवलच. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT