Visit to the Finance Minister before leaving the country says Vijay Mallya
Visit to the Finance Minister before leaving the country says Vijay Mallya 
देश

देश सोडण्यापूर्वी घेतली अर्थमंत्र्यांची भेट : विजय मल्ल्या

पीटीआय

लंडन : भारत सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा विजय मल्ल्याने आज केला. प्रत्यार्पणासंबंधी येथील वेस्टमिनिस्टर न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस आज मल्ल्या उपस्थित होता. बॅंकांच्या कर्जाबाबत तडजोडीचा प्रस्ताव कर्नाटक उच्च न्यायालयासमोर ठेवला होता, असेही मल्ल्याने म्हटले आहे. 

सुनावणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना मल्ल्या म्हणाला, ""जिनिव्हातील एका नियोजित बैठकीसाठी भारतातून रवाना होण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत मी बॅंकांच्या कर्जाबाबात तडजोडीची तयारी दर्शविली होती.'' मल्ल्याने संबंधित मंत्र्याच्या नावाचा उल्लेख टाळला असून, तो फरार झाला तेव्हा (2016) अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. 
मल्ल्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यास भारताला अपयश आले असून, यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या दृष्टीने आवश्‍यक प्रथमदर्शनी खटला दाखल करता येणार नाही. किंगफिशर दिवाळखोरीत निघणे हे व्यवसायिक अपयश असून, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. किंगफिशर तोट्यात असल्याची माहिती संबंधित बॅंकेला होती, हे बॅंक अधिकाऱ्यांच्या ई-मेलवरून स्पष्ट होते. असा युक्तिवाद मल्ल्याच्या वकिलाने केला. 

दरम्यान, प्रत्यार्पणानंतर मल्ल्याला मुंबईतील तुरुंगात ठेवले जाणार असून, तेथील स्थिती दर्शविणारा व्हिडिओ आज न्यायालयात सादर करण्यात आला. 

मल्ल्या-जेटली भेटीची सखोल चौकशी व्हावी. या सर्व प्रकरणात मल्ल्यावर बॅंकांचे इतके कर्ज असूनही त्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी कशी मिळाली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. 

- मनू सिंघवी, कॉंग्रेस नेता  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT