air vistara
air vistara 
देश

कारगिल हिरोचा फोटो हटविल्याने 'BoycottVistara' ट्रेंड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील हिरो मेजर जनरल जी. डी बक्षी यांच्यासोबत एअर विस्ताराच्या हवाई सुंदरींनी काढलेला फोटो ट्विटरवर अपलोड केल्यानंतर काढण्यात आल्याने नेटिझन्सने टीकेची झोड उठवत BoycottVistara हा ट्रेंड सुरु केला आहे.

एअर विस्ताराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शुक्रवारी मेजर जनरल बक्षी यांनी आमच्या एअरलाईन्सची निवड केल्याने हवाई सुंदरींसह फोटो प्रसिद्ध केला होता. तसेच त्यांनी कारगिलचा हिरो आमच्यासोबत असल्याने हा आमचा सन्मान असल्याचे म्हटले होते. पण, विस्ताराच्या या ट्विटला अनेक देशविरोधी आणि उदारमतवाद्यांनी लक्ष्य केले. विस्तारावर हा फोटो हटविण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे रविवारी एअर विस्ताराने हा फोटो हटविला.

विस्ताराने हे ट्विट हटविल्यानंतर देशभक्तांकडून याला प्रत्युत्तर देत विस्तारावर बहिष्कार टाकला. त्यानंतर ट्विटरवर BoycottVistara हा ट्रेंड सुरु झाला. सध्या ट्रेंडमध्ये हा ट्रेंड पहिल्या स्थानावर असून, देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

या सर्व प्रकरणावर दिल्लीतील भाजप नेते तजिंदरपालसिंह बग्गा यांनी म्हटले आहे, की देशविरोधी नागरिकांच्या प्रतिक्रियांमुळे एअर विस्ताराने हे ट्विट हटविले. जोपर्यंत विस्तारा हा फोटो पुन्हा ट्विट करत नाही, तोपर्यंत मी एअर विस्ताराने प्रवास करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT