Warning to Theater in Telangana
Warning to Theater in Telangana 
देश

तेलंगणमधील चित्रपटगृहांना इशारा 

सकाळवृत्तसेवा

हैदराबाद : तेलंगणमध्ये 1 ऑगस्टपासून एक पडदा व मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांनी पाण्याचा बाटली, शीतपेये व अन्य पदार्थांची विक्री कमाल किरकोळ किमतीनुसार (एमआरपी) करणे बंधनकारक करण्यात आले. जादा दराने विक्री करणाऱ्यांना मोठा दंड व तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल, असा इशारा वैधमापन नियंत्रक अकून सभरवाल यांनी दिला. 

अन्नपदार्थ व पेयाची सुटी विक्री केल्यास त्याच्या ग्लासावर दर व वजनाचा स्टिकर चिकटवणे अनिवार्य आहे. 
चित्रपटगृहांमध्ये अन्नपदार्थ व पेयांची विक्री जादा दराने करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वैधमापन विभागाकडे काही दिवसांपासून येत आहेत. याची दखल घेत संबंधित चित्रपटगृहांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा मार्गदर्शक सूचनाही चित्रपटगृहचालकांना दिल्या आहेत. 

या आदेशाचे पालन न केल्यास पहिल्या वेळेला 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा चूक केल्यास 50 हजार रुपये व तिसऱ्या वेळी एक लाख रुपयांचा दंड व सहा महिने ते एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सभरवाल यांनी सांगितले. ग्राहकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक व व्हॉट्‌सऍप क्रमांक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT