supreme court esakal
देश

Two Finger Test : सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली टू फिंगर टेस्ट काय आहे? कशी होते टेस्ट

सायन्स पण टू फिंगर टेस्टिंग नाकारतं. यावरूनच महिला व्हर्जीन आहे किंवा नाही याचा पुरावा मानला जातो.

सकाळ डिजिटल टीम

What Is Two-Finger Test : सुप्रीम कोर्टाने सोमवारी (३१ ऑक्टोबर) बलात्काराच्या खटल्यांमध्ये टू फिंगर टेस्ट वर बंदी घातली आहे. असं करणाऱ्यांना दोषी मानलं जाईल. ही टेस्ट आजही केली जाते याविषयी कोर्टाने खेद व्यक्त केला. नक्की काय असते ही टेस्ट? जाणून घेऊया

काय असते ही टेस्ट?

टू फिंगर टेस्टमध्ये पीडित महिलेच्या योनीमध्ये दोन बोटं घालून तिची व्हर्जीनिटी टेस्ट केली जाते. यातून महिलेसोबत शारीरिक संबंध झाले आहेत की, नाही हे ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. जर बोटं सहज आत गेले तर महिला सेक्शुअली ॲक्टिव्ह समजली जाते. आणि यालाच महिला व्हर्जीन आहे की, नाही याचा पुरावा समजला जातो.

विज्ञान पण नाकारतं अशी टेस्ट

न्यायाधिश चंद्रचूड यांच्या नेतृत्वात सुनावणी देताना कोर्टाने पुन्हा पुन्हा बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत टू फिंगर टेस्टची निंदा केली आहे. कारण विज्ञान अशा टेस्टला पूर्णपणे नाकारतं. विज्ञानाचं मत आहे की, महिलांच्या व्हर्जीनिटीमध्ये हायमन चा इंटॅक्ट असणं हा एक भ्रम आहे.

मानसिक अत्याचार करणारी टेस्ट

यापूर्वीपण हरियाणा राज्यातल्या लिलू राजेश बनाम केसमध्ये (२०१३) सुप्रिम कोर्टाने टू फिंगर टेस्टला असंविधानिक ठरवलं होतं. कोर्टाने या टेस्टवर कठोर शब्दही काढले होते. बलात्कार पीडितेच्या सन्मानाची आणि खासगी पणाचं हनन असल्याचं ठरवलं होतं. यामुळे मानसिक अत्याचार होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

SCROLL FOR NEXT