jaylalitha
jaylalitha 
देश

जयललितांच्या 114 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण?

वृत्तसंस्था

चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत्यूपत्र तयार केले नसल्यामुळे त्यांच्या 114 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वारसदार कोण? शिवाय, त्यांचा राजकीय वारसा यापुढे कोण चालविणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

जयललिता यांनी एप्रिल 2015 मध्ये राधकृष्णन नगरमधून विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये 41.63 रुपयांची स्थावर मालमत्ता व 72 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचा उल्लेख केला होता. शिवाय, बॅंकेमध्ये 2.04 कोटी रुपये व जवळ 41 हजार रुपये असल्याचे म्हटले होते. याशिवाय 21280 ग्रॅम सोन्याचे दागिने व 3.12 कोटी रुपयांचे 1250 किलोग्रॅम चांदी असल्याचेही म्हटले होते.

जयललितांची पाच कंपन्यांमध्ये भागीदारी असून, त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज नाही. तमिळनाडूमध्ये विविध ठिकाणी त्यांचे बंगले व जमिनी आहेत. यामध्ये तेयनामपेठ गावातील 81, पोएस गार्डन येथील 'वेद निलायम' हे बंगले आहेत. 24, 000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेल्या बंगला, तेथे कोट्यावधी रुपयांच्या संपत्ती आहे.

जयललिता या ऐशोरामात जीवन जगल्या. त्यांची जीवनशैली नेहमीच चर्चेत राहिली. महागड्या साड्या, चपला व सोन्याची आवड होती. सन 1996 मध्ये त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला त्यावेळी त्यांच्याकडील वस्तू पाहून अधिकारी आश्‍चर्यचकित झाले. छाप्यादरम्यान 896 किलो चांदी, 28 किलो सोने व 10 हजारहून अधिक महागड्या साड्या आढळून आल्या. शिवाय, 51 महागडी घड्याळे व 750 चपला मिळाल्या होत्या. या सर्व संपत्तीचा आता वारस कोण होणार? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

जयललिता यांची जवळची मैत्रीण शशीकला नटराजन?, की भाची दीपा जयकुमार व भाऊ दीपक हे संपत्तीवर दावा करणार का? जयललिता यांच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित राहू शकले नाहीत. जयललिता यांनी व्ही. एन. सुधाकरन याला दत्तक घेतले होते. सन 1995 मध्ये मोठ्या उत्साहात त्याचा विवाह केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. सुधाकरनच्या विवाहानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक दुरावले ते शेवटपर्यंत. शिवाय, विवाहानंतर सुधाकरनही दुरावला होता. जयललितांवर दफनविधी झाल्यानंतर त्यांची मैत्रीण शशीकला या 'वेद निलायम'मध्ये दाखल झाल्या होत्या. यामुळे संपत्तीवर कोण दावा करणार? हे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT