देश

आम्ही 'त्या' सर्व मुलांना दत्तक घेऊ: नवज्योतसिंग सिद्धू

वृत्तसंस्था

चंदीगढ : अमृतसर रेल्वे दुर्घटनेत ज्या मुलांचे पालक मृत्यूमुखी पडले आहेत अशा सर्व अनाथ झालेल्या मुलांना आम्ही दत्तक घेऊ, असे पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. त्या मुलांच्या शिक्षणाचा आणि बाकीचा सर्व खर्च ते स्वतः आणि त्यांची पत्नी मिळून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातावेळी सुरु असलेल्या कार्यक्रमात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंजाबच्या अमृतसर येथील जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान 61 हून अनेकांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले.

अपघात झाल्यानंतर नवज्योत कौर सिद्धू न थांबता तशाच पळून गेल्या असा आरोप प्रत्यक्षदर्शींकडून केला जात होता. यावर कौर यांनी स्पष्टीकरणही दिले होते. त्यानंतर आता हा निर्णय नवज्योतसिंग सिद्धू यांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT