देश

लोकसभा निवडणुकीबाबत रजनीकांतकडून मोठी घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता याबाबत स्वत: रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह वापरू नये, असेही बजावले आहे.

मागील वर्षी रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढत राजकारणात प्रवेश केला. या पक्षस्थापनेनंतर रजनीकांत आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आपला पक्ष किंवा मी स्वत: लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. याशिवाय आमचा पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याने राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये, असेही सांगितले. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, रजनीकांत यांनी हे स्पष्टीकरण दिल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT