देश

भविष्यात चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करू : सिवन

पीटीआय

नवी दिल्ली : चांद्रयान 2' मोहिमेचा शेवट झालेला नाही. भविष्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लॅंडर सुलभपणे उतरण्यासाठी (सॉफ्ट लॅंडिग) पुन्हा कसून प्रयत्न केला जाईल,'' असा विश्‍वास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी शनिवारी व्यक्त केला. 

आयआयटी दिल्लीच्या 50 व्या पदवीदान समारंभात सिवन बोलत होते. भारताची महत्त्वाकांक्षी "चांद्रयान 2' मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात विक्रम लॅंडरचे चंद्रावर "सॉफ्ट लॅंडिंग' झाले नाही. त्यामुळे ही मोहिम 100 टक्के यशस्वी झाली नाही. यानंतरही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडर उतरविण्याचा दुसरा प्रयत्न "इस्त्रो' करणार का, असा प्रश्‍न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता आमच्याकडे खूप महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. भविष्यात "इस्त्रो' अनुभव व तंत्रज्ञानात सुधारणा करीत "सॉफ्ट लॅंडिंग'चा सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा दिलासा मी तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.

तांत्रिक गोष्टींचा विचार केला असता, विक्रम लॅंडर चंद्रावर सुलभपणे उतरु शकले नाही, ही खरे आहे. मात्र लॅंडरची संपूर्ण यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागापासून 300 मीटर दूरपर्यंत योग्य पद्धतीने सुरू होती, असेही ते म्हणाले. 

"इस्त्रो'च्या आगामी योजनांची माहिती देताना सिवन म्हणाले की, आगामी महिन्यांमध्ये अत्याधुनिक उपग्रह अवकाशात सोडण्याची "इस्त्रो'ची योजना आहे. आपली "आदित्य एल 1' मोहीम आणि मानवी अवकाश मोहीम कार्यक्रम तयार आहे.

"एसएलएलव्ही'चे डिसेंबर किंवा जानेवारीत उड्डाण होणार आहे. 200 टन सेमी क्रायो इंजिनाच चाचणी लवकरच करण्यात येणार आहे. मोबाईलवर "नाविक' संदेश पाठविण्यासंबंधीही काम सुरू होणार आहे. 

आयआयटी दिल्लीत "अवकाश तंत्रज्ञान' 

"इस्त्रो'च्या मदतीने आयआयटी दिल्लीत अवकाश तंत्रज्ञान विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर सिवन यांनी आज स्वाक्षरी केली. पदवीदान समारंभात एक हजार 217 पदव्युत्तर आणि 825 पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

विद्यार्थ्यांशी संवाद 

- स्पेशलायझेनशच्या क्षेत्रात पूर्वीपेक्षा अनेक पर्याय उपलब्ध 
- अस्थिरता, अनिश्‍चितता आणि गुंतागुंतीच्या स्थितीशी लढण्यास तुम्ही आधीच्या पिढीपेक्षा जास्त सक्षम 
- आयुष्य एकदाच मिळत असल्याने आवड व नैसर्गिक बुद्धिमत्ता ओळखून करिअर निवडा 
- पैशासाठी नोकरी करण्यापेक्षा आनंदासाठी करा 
- यशासाठी सर्वोच्च स्थान, अत्यंत हुशारी किंवा जास्त गुण मिळविण्याची गरज नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT