Woman PhD scholar found hanging in IIT Madras Hostel Room
Woman PhD scholar found hanging in IIT Madras Hostel Room 
देश

पीएचडी स्कॉलर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संशोधन विभागात शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित महिला मद्रास येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' येथे शिक्षण होती. ही महिला झारखंड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना कुमारी असे या महिलेचे नाव असून, 2017 मध्ये मद्रास आयआयटी येथे प्रवेश घेतला होता. रंजना कुमारी ही धातू आणि साहित्य या विषयात आभियांत्रिकीत पीएचडीचे शिक्षण घेत होती. रंजनाच्या पालकांनी तिला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा मोबाईल क्रमांक बंद लागत होता. त्यानंतर त्यांनी रंजना कुमारीच्या मित्रांशी संपर्क केला. तेव्हा या महिलेची ओळख पटली. जेव्हा या सर्वांनी रंजना यांच्या खोलीत जाऊन पाहिले. तेव्हा त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती कोट्टूपुरम पोलिसांनी दिली. 

दरम्यान, आम्ही याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून, याची चौकशी केली जाणार आहे. तसेच आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, असेही पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT