milk man of india google
देश

जागतिक दूध दिन : दूध न आवडणारा मुलगा बनला 'मिल्क मॅन ऑफ इंडिया'

दूधाचा महापूर या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

नमिता धुरी

मुंबई : श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी १९४९पासून त्यांनी दूध उत्पादन क्षेत्रात काम सुरू केले.

भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये गुजरातच्या आणंद येथे झाली. त्या सुमारासच "खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड" ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.

वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. "गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड" या पालक संस्थेने १४ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून "आणंद मिल्क युनियन लिमिटेड" असे नाव ठेवले. नव्या जोशात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

'मिल्क मॅन ऑफ इंडिया'

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले इंडिया. ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. त्यामुळे कुरियन यांना 'मिल्क मॅन ऑफ इंडिया'चा किताब मिळाला.

अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका, बांग्लादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते.

दूधाचा महापूर

दूध हा नावडता पदार्थ असणाऱ्या कुरियन यांनी दूध क्षेत्रात मोठे कार्य उभे केले. त्यांनी १९७०मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर ही योजना राबविली. या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वर्गीस यांच्या हस्ते १६ जुलै १९६५ रोजी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना करण्यात आली.

मूत्रपिंडाच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. ९ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT