
Why Baisaran Valley Became the Prime Target: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यालाच का लक्ष्य केले, यामागचे कारण आता समोर आले आहे. बैसरन खरे हे पर्यटकांनी गजबजलेले असते आणि हा परिसर तुलनेने वेगळा आहे, त्यामुळेच दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला, असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा निर्घृण हत्या झाली. संतापाची बाब म्हणजे दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. एनआयएने असेही म्हटले आहे की या हल्ल्यात पाकिस्तानातील तीन दहशतवादी थेट सहभागी होते.
तर एका रिपोर्टमध्येत असेही म्हटले आहे की दहशतवादी संघटनेने बैसरनची निवड केली कारण येथे पर्यटकांची संख्या मोठी आहे आणि सुरक्षा दलांना प्रतिसाद देण्यास वेळ लागेल. म्हणूनच ते एक सोपे आणि मोठे लक्ष्य मानले जात होते. हल्ल्यादरम्यान, दहशतवादी विशेषतः कुटुंबासह जेवणाची दुकाने, पोनी राईड्स किंवा सहलीचा आनंद घेणाऱ्यांना लक्ष्य करत होते.
जूनमध्ये, एनआयएने परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर या दोघांना अटक केली. हे दोघेही दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि रसद पुरवण्यात सहभागी होते. त्यांच्या अटकेनंतर असे उघड झाले की हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि ते लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. एनआयएने म्हटले आहे की हा हल्ला पाकिस्तानने रचलेल्या कटाचा भाग होता.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांना आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या संघटनांकडून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले जात होते. या कारवाईत नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.