PM Narendra Modi
PM Narendra Modi  esakal
देश

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे लोकार्पण

सकाळ डिजिटल टीम

Karnataka News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक येथील हुबळी येथे जगातल्या सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही उपस्थिती होती.

कर्नाटकाच्या हुबळी येथील जगातल्या सर्वात लांब प्लॅटफॉर्मची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कर्नाटकातील श्री सिद्धारुधा स्वामीजी रेल्वे स्थानकावर हा प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेला आहे. या प्लॅटफॉर्मसाठी २०.१ कोटी रुपयांचे खर्च आलेला आहे.

सिद्धारुधा स्वामी रेल्वे स्थानकावरील हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर अंतराचा आहे. या प्लॅटफॉर्मचे बांधकाम फेब्रुवारी २०२१मध्ये सुरु करण्यात आले होते. हुबळी येथील हे जंक्शन बंगळुरु, होसापेटे आणि वास्को द गामा या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे.

हुबळी रेल्वे स्थानकात वाढत असलेली गर्दी पाहून आणखी तीन प्लॅटफॉर्म येथे बांधण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हा १ हजार ५०७ मीटर आहे. त्यामुळेत हा प्लॅटफॉर्म जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून गौरवला जातोय. इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या दोन रेल्वेगाड्या एकाचवेळी या लांब प्लॅटफार्मवरुन सुटू शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लॅटफॉर्मच्या लोकार्पणासह ११८ किलोमीटर लांबीच्या बंगळूरु-म्हैसूर एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले. या महामार्गासाठी ८ हजार ४८० कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. त्यामुळे तीन तासांच्या प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवर येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT