yogendra yadav
yogendra yadav योगेंद्र यादव
देश

योगेंद्र यादव म्हणतात, २०२४ चा रस्ता खडतर होता, तो आता...

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत. चार राज्यांत भाजपचा भगवा फडकला आहे. तर पंजाबमध्ये सत्तेची चावी आम आदमी पक्षाच्या हातात आहे. शेतकरी संघटनांनी यापूर्वी केलेल्या भाजपविरोधी आवाहनांचा जनतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचे निवडणूक निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. युनायटेड किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (assembly election) भाजपच्या (BJP) विजयावर योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीचे निकाल निराशाजनक असले तरी धक्कादायक नाहीत. भारताच्या आत्म्याला वाचवण्याच्या संघर्षाला हा धक्का आहे. २०२४ चा रस्ता नेहमीच खडतर होता, पण आज तो अधिक कठीण झाला आहे, असे ट्विट योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी केले.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत योगेंद्र यादव (Yogendra Yadav) लिहितात की, जर आपण सत्तेशी संघर्ष करण्यास आणि समाजाशी संवाद साधण्यास तयार आहोत, तर आपण कमजोर नाही. आमच्याकडे या देशाची माती आहे, आमच्याकडे या देशाचा वारसा आहे, आम्ही एकटे नाही. लढणार... जिंकणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT