देश

या तरुणाने प्लॅस्टिकचा पर्नवापर करुन लोकांसाठी बनवले शौचालय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: सरकार सध्या शौचालयाचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. बरेच लोक आता प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबाबत जागरुक झालेले दिसत आहेत. दिल्लीत राहणारा अश्‍विनी अग्रवाल या तरुणाने प्लॅस्टिकचा पुर्नवापर करुन सार्वजनिक शौचालये बनवली आहेत. ही शौचालये एकवेळ वापरुन फेकुन दिलेल्या प्लॅस्टिकपासून बनविण्यात आली असून यात बाटल्यांचा जास्तीजास्त वापर करण्यात आला आहे. 


अश्विनी म्हणाले, "आम्ही 'बेसिक शिट' प्रकल्पांतर्गत लोकांसाठी सिंगल यूज प्लास्टिकची शौचालये बनविली आहेत." सावजनिक ठीकाणी लघवीसाठी शौचालये असून लोक याचा वापर विनामुल्य करु शकतात. आम्ही दिल्लीच्या धौलाकुआन रोडवर पहिले शौचालय बसविले. यानंतर एम्सच्या बाहेर रिंग रोडवर दुसरे टॉयलेट बसविण्यात आले. लोकांना मोफत शौचालय देणे हे आमचे उद्दीष्ट आहे. 'बेसिक शिट' प्रकल्पात माझे मित्र अदिती, आशु, युवा आणि सहज यांचा समावेश आहे. 
 

कल्पना आली कोठून ? 
अश्विनी दिल्ली विद्यापीठात कला शिकत होता. 2014 मध्ये त्याने बेसिक शिट या महाविद्यालयाच्या प्रकल्पात काम करण्यास सुरवात केली. हा एक महाविद्यालयीन प्रकल्प असला तरी अश्‍विनीला समजले की देशात सार्वजनिक शौचालयांची मोठी गरज आहे. लोकांना शौचालयात जाण्याऐवजी 2 रुपये देऊन मोकळ्यामध्ये लघवी करणे पसंत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या महाविद्यालयीन प्रकल्पांतर्गत प्लास्टिकमधून शौचालय बांधले आणि त्यानंतर धौलाकुआन येथे पोलिस स्टेशनमध्ये पहिले शौचालय बसविले. अश्विनीने सांगितले की तो प्लास्टिकच्या बाटल्या मिक्‍सरमध्ये पीसतो आणि साहित्य तयार करतो आणि तेथून तो शौचालय बनवितो. 

एका शौचालयाची किंमत 12 हजार रुपये 
शौचालय बांधण्यास सुमारे 12 हजार रुपये खर्च येतो. ते तयार करण्यासाठी 3-4 लोक लागतात. शौचालयांचा वापर 10 ते 12 वर्षे केला जाऊ शकतो. आम्ही यूरिनल टॉयलेट आणखी उत्कृष्ट बनविण्यासाठी कार्य करीत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT