ITI
ITI sakal
एज्युकेशन जॉब्स

ITI Admission : आयटीआयमध्ये घेतले १ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात तब्बल ९५ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहता यंदा प्रवेशाची टक्केवारी सर्वाधिक असल्‍याचे दिसून आले आहे. यासाठी विभागाकडून प्रवेश प्रक्रियेमध्ये करण्यात आलेले अनेक बदल आणि नियोजन हे महत्त्वाचे ठरले असल्‍याचे सांगितले जात आहे.

आयटीआयमधील विविध प्रकारच्या ८३ ट्रेडच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमार्फत राबविण्यात आली. या प्रक्रियेंतर्गत राज्यभरातील शासकीय आयटीआयमध्ये १ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती दिली आहे. गतवर्षी १ लाख २४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. 

आयटीआयची जूनपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. राज्यात ४१७ संस्थांमध्‍ये १ लाख ४२ हजार ५००  जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या सहा फेऱ्यांनंतर प्रवेशाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशात वाढ झाली आहे. मात्र खासगी आयटीआयलाही गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. 

आयटीआयमध्‍ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी वर्गाचा कल वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्के अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
- दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन

जागेनुसार आकडेवारी
संस्‍था - जागा - प्रवेश

शासकीय आयटीआय - ९३,४८४ - ८९,३८३
खासगी आयटीआय - ४९,०१६ - ३५,६६९
एकूण - १,४२,५०० - १,२८,१७१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT