Pune University
Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

पुणे विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांची नियुक्ती अद्याप अधांतरीच!

मीनाक्षी गुरव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सूत्रे स्वीकारून आठवडा झाला, तरीही अद्याप चारही अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सूत्रे स्वीकारून आठवडा झाला, तरीही अद्याप चारही अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. किंबहुना सध्या कार्यरत असणाऱ्या अधिष्ठात्यांना अद्याप पदातून मुक्त केलेले नाही. परिणामी या अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा निर्णय अधांतरीच आहे. दरम्यान, याबाबत बुधवारी (ता. २५) काही निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरू यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेले प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांचा कार्यकाळ कुलगुरू यांच्या समवेत संपतो. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल १८ मे रोजी संपला. याच दिवशी राजभवन कार्यालयाने विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभारी पदभार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाचे तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच आपला पदभार सोडून गरवारे महाविद्यालयात प्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. करमळकर यांच्यासमवेत विद्यापीठाच्या चारही अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला आहे. प्रभारी कुलगुरू पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर डॉ. काळे यांनी, ‘विद्यापीठाच्या चारही अधिष्ठात्यांच्या नियुक्ती संदर्भात कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल,’ असे स्पष्ट केले होते. परंतु आता आठवडा झाला, तरीही अद्याप अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

दरम्यान, नवीन कुलगुरू यांना विद्यमान अधिष्ठात्यांची सेवा पुढे सुरू ठेवण्याचे अधिकार आहेत. विद्यापीठातील शैक्षणिक कामे गतीने होण्यासाठी विद्याशाखेचा प्रमुख म्हणून अधिष्ठाता हे महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यामुळे अधिष्ठाता पदांच्या निवडीच्या निर्णयाकडे शिक्षण वर्तुळातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.

‘विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांच्या नियुक्ती संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला सविस्तर नोंद करण्याची सूचना दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची सूत्र स्वीकारून आठ दिवस होत असले, तरीही त्यानंतर दोन दिवस सुट्यांचे दिवस होते. तसेच गेली दोन दिवस अधिकृत नियोजित बैठका होत्या. मात्र, अधिष्ठातांच्या नियुक्तीबाबत बुधवारी (ता. २५) बैठक होणार असून त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.’

- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : राजस्थानने नाणेफेक जिंकली; संजू प्ले ऑफचा खुट्टा अजून बळकट करण्यासाठी सज्ज

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT